top of page

रूट कॅनल (दातांच्या नसेची ट्रीटमेंट) खरच गरजेचे आहे का?

  • Writer: Sumit Firke
    Sumit Firke
  • Mar 26
  • 4 min read

संध्याकाळी क्लिनिकमध्ये पेशंट चालू होते. मी एक रूट कॅनल पूर्ण करत होतो. एवढ्यात वेटिंग एरियातून तीव्र वेदनेच्या आवाजाने लक्ष वेधलं. मी सेजलला आत बोलावलं आणि विचारलं, "काय झालं?"

ती म्हणाली, "सर, बाहेर एक पेशंट आलेत, त्यांना खूप त्रास होतोय. काहीतरी त्वरित करायला लागेल."

मी तिला सांगितलं, "त्यांना एक पेनकिलर दे. थोड्या वेळाने बरा वाटेल."

Painless Root Canal Treatment in Dombivli

मी पुढची पंधरा-वीस मिनिटं माझं चालू असलेलं काम संपवलं. त्या दरम्यान तो पेशंट बाहेरच थांबलेला होता. शेवटी त्यांना आत बोलावलं. अंदाजे चाळीशीच्या आसपास असावेत. चेहऱ्यावर वेदनेचं सावट स्पष्ट दिसत होतं.

"बसा... आता थोडं बरं वाटतंय का?" मी विचारलं.

"हो डॉक्टर, थोडं कमी झालंय पण अजूनही टोचतंय..."

"काय झालंय नक्की?"

"डॉक्टर, दोन दिवसांपासून हा दात ठणकत होता, पण काही विशेष त्रास नव्हता. म्हणून दुर्लक्ष केलं. पण आज संध्याकाळी अचानक भयंकर वेदना सुरू झाल्या. मिटिंग अर्ध्यात सोडून आलो."

"बरं, बघूया काय झालय ते."

मी त्यांना डेंटल चेअरवर बसवलं. Mouth mirror आणि explorer घेऊन तपासणीला सुरुवात केली. खालच्या जबड्यात एका दातात मोठा खड्डा दिसत होता. काळपट आणि सडलेल्या भागावर टूल टेकवल्यावर पेशंट ताडकन हलला.



"आsssह! डॉक्टर, खूप टोचलं!"

"ठीक आहे, X-ray काढूया."


मी X-ray काढला आणि स्क्रीनवर पाहिलं. मला अंदाज आला होता की नक्की काय झालंय.

"हे बघा..." मी स्क्रीनकडे हात करत म्हणालो.

"हा मोठा काळा डाग दिसतोय का? ही कीड आहे. आणि या दोन काळ्या रेषा पाहा – त्या नस आहेत. तुमच्या दाताची कीड नसांपर्यंत पोहोचली आहे. म्हणून हा दात ठणकत आहे."


"म्हणजे काय झालंय डॉक्टर?"


"जेव्हा कीड सुरुवातीच्या स्टेजला असते, तेव्हा ती फक्त दाताच्या बाहेरील भागापुरती असते. तेव्हा भरून टाकता येतं. पण जर कीड वाढत गेली आणि आतल्या नसांपर्यंत पोहोचली, तर तीथे संसर्ग होतो. म्हणून दात इतका ठणकतोय."


"डॉक्टर मग आता काय करायचं?"


"आता दुखणं थांबवायचं असेल, तर ट्रीटमेंट करावी लागेल. आणि सर्वोत्तम उपाय म्हणजे रूट कॅनल ट्रीटमेंट."

"बापरे डॉक्टर! ऐकलंय की RCT खूप दुखतं आणि खूप वेळ यावं लागतं. नुसतं सीमेंट भरलं तरी चालणार नाही का?"


"नुसती फिलिंग करून काही उपयोग नाही. कारण तुमच्या दाताची रचना समजून घेतली पाहिजे. आपल्या दाताचे तीन स्तर असतात – बाहेरून आत अशी. पहिला स्तर म्हणजे एनॅमल, हा टणक आणि संरक्षण करणारा असतो. दुसरा स्तर डेन्टीन – हा थोडा सॉफ्ट असतो आणि संवेदनशील नसतो. आणि तिसरा स्तर म्हणजे पल्प – यामध्ये रक्तवाहिन्या आणि नस असतात.


सुरुवातीला कीड फक्त एनॅमल आणि डेन्टीनमध्ये असते, त्यामुळे वेदना होत नाहीत. पण जर कीड पल्पपर्यंत पोहोचली, तर संसर्ग होतो आणि वेदना भयंकर होतात. अशा वेळी फिलिंग करून काहीच फायदा नाही. कारण फिलिंग फक्त वरून लावली जाते. आतली इन्फेक्शन तशीच राहते. त्यामुळे रूट कॅनल करावंच लागतं."


"म्हणजे आता दुसरा पर्याय नाही?"

"तुम्ही वेदना सहन करत राहू शकता किंवा दात काढून टाकू शकतो. पण हा दात काढला तर जागा मोकळी राहील आणि नंतर त्यासाठी ब्रिज किंवा इम्प्लांट लावावं लागेल, जे अधिक खर्चिक ठरेल. त्यामुळे रूट कॅनल हा सर्वोत्तम पर्याय आहे."


"डॉक्टर, पण हे फार वेदनादायक नसेल ना?"

"आजकाल तंत्रज्ञान खूप पुढे गेलंय. रूट कॅनल आता जवळपास वेदनारहित करता येते. लोकल अनेस्थेशिया देऊन दात सुन्न केला जातो. मग कीडलेला भाग आणि मुळातील नस काढून टाकल्या जातात. मग त्या मुळाच्या जागी औषध लावलं जातं, आणि शेवटी तो भाग सील केला जातो. शेवटी, दात टिकून राहावा म्हणून त्यावर क्राऊन बसवलं जातं. त्यामुळे हा दात १०-१५ वर्षं आरामात टिकेल."


"म्हणजे दात काढावा लागणार नाही?"

"नाही, रूट कॅनलमुळे दात वाचेल."

"ठीक आहे डॉक्टर, मग करूया."


मी त्यांना उपचाराची पुढची पद्धत समजावून सांगितली. सेजलला बोलावून तयारी करायला सांगितलं. आणि पेशंट रिलीफच्या भावनेने शांत झाला.

"डॉक्टर, मी खूप घाबरलो होतो, पण तुम्ही इतकं व्यवस्थित समजावलं की आता भीती वाटत नाही."

"तुमच्या वेदना लगेच कमी होतील. आणि काही दिवसांत हा दात पूर्ण बरा होईल."

त्यांनी माझ्याकडे बघितलं आणि समाधानाने स्मितहास्य केलं. "डॉक्टर, खरंच धन्यवाद! रूट कॅनल ट्रीटमेंट – तुमच्या दातासाठी सर्वोत्तम पर्याय!


Single sitting root canal in dombivli

वरील संवादातून तुम्हाला समजलं असेल की, रूट कॅनल ट्रीटमेंट (RCT) म्हणजे काय आणि ती का करावी लागते. आता या ट्रीटमेंटबद्दल थोडी अधिक माहिती घेऊया.

रूट कॅनल ट्रीटमेंट म्हणजे काय?

रूट कॅनल ट्रीटमेंट ही अशी प्रक्रिया आहे जिथे दाताच्या आत गेलेली कीड पूर्णपणे काढली जाते आणि त्या जागी खास औषध भरून दात वाचवला जातो. ही ट्रीटमेंट केल्यानंतर तुम्हाला कोणताही त्रास जाणवणार नाही आणि दात दीर्घकाळ टिकेल.

रूट कॅनल कधी करावी लागते?

जर तुमच्या दाताला खालील लक्षणं दिसत असतील तर तुम्हाला रूट कॅनलची गरज भासू शकते:

✔️ तीव्र दातदुखी, विशेषतः रात्री

✔️ गरम किंवा थंड पदार्थांमुळे दात दुखणे

✔️ दाताला सूज येणे किंवा हिरड्यांमध्ये गाठ येणे


✔️ दातात मोठा खड्डा आणि ब्लॅक स्पॉट दिसणे

रूट कॅनल ट्रीटमेंट का आवश्यक आहे?

दात टिकवण्याचा सर्वोत्तम मार्ग: जर दात काढला तर त्या जागी इम्प्लांट किंवा ब्रिज बसवावा लागतो, जो अधिक खर्चिक आणि वेळखाऊ असतो.

वेदनारहित प्रक्रिया: आजकाल आधुनिक तंत्रज्ञानामुळे रूट कॅनल ट्रीटमेंट जवळपास वेदनारहित झाली आहे.

दाताची नैसर्गिक रचना टिकवली जाते: हा दात मजबूत राहतो आणि योग्य प्रकारे चावायला मदत करतो.

लांब टिकणारा उपाय: एकदा रूट कॅनल केल्यावर योग्य काळजी घेतली तर तो दात अनेक वर्षं चांगल्या स्थितीत राहतो.


रूट कॅनल प्रक्रिया कशी केली जाते?

1️⃣ X-ray आणि निदान: प्रथम X-ray काढून दाताच्या मुळात किती कीड गेली आहे हे पाहिलं जातं.

2️⃣ लोकल अनेस्थेशिया: वेदना होऊ नयेत म्हणून दात सुन्न केला जातो.

3️⃣ कीडलेला भाग स्वच्छ करणे: कीड झालेली नस आणि संक्रमण काढून टाकले जाते.

4️⃣ डेंटल फिलिंग: दाताच्या आत योग्य प्रकारचं औषध भरलं जातं.

5️⃣ क्राऊन बसवणे: शेवटी दात मजबूत करण्यासाठी क्राऊन (टोपी) बसवली जाते.


रूट कॅनल नंतरची काळजी:

🦷 RCT केल्यानंतर काही तास काहीही खाऊ नका, जेणेकरून फिलिंग व्यवस्थित सेट होईल.🦷 सुरुवातीला सौम्य वेदना किंवा हलकासा दाब जाणवू शकतो, पण काही दिवसांत तो कमी होतो.🦷 गरम, थंड किंवा खूप कडक पदार्थ टाळा.🦷 नियमित ब्रश आणि फ्लॉस करा आणि दर ६ महिन्यांनी डेंटिस्टकडे तपासणीसाठी जा.


डोंबिवलीतील सर्वोत्तम रूट कॅनल ट्रीटमेंट – Tulip Dental Dombivli

जर तुम्हालाही दातदुखीचा त्रास होत असेल आणि सर्वोत्तम Root Canal Treatment in Dombivli शोधत असाल, तर Tulip Dental Dombivli येथे अनुभवी आणि विश्वासार्ह उपचार मिळतील.

 
 
 

Comments

Rated 0 out of 5 stars.
No ratings yet

Add a rating
bottom of page